मुंबई : (Parth Pawar) पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव थेट समोर येत असून, पॉवर ऑफ अॅटर्नीच्या कागदपत्रांवर पार्थ पवारांची सही असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये पार्थ पवार (Parth Pawar) यांनी तेजवानी यांना पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती. या पॉवर ऑफ अॅटर्नीच्या प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही आहे. मुंढवा येथील जमिनीबाबत अत्यंत धक्कादायक कागदपत्रे आमच्या हाती लागली असून, ती अॅड. तृप्ती ठाकूर यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले."
हेही वाचा : लाट आहे...
दमानिया यांनी पुढे आरोप केला की, "२०२३ पासून या संपूर्ण व्यवहारात अजित पवारांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) सर्व काही ‘मॅनेज’ करत होते. अजित पवारांना या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती, हे शक्य आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला." (Parth Pawar)
या प्रकरणात पार्थ पवारांचे (Parth Pawar) नाव अद्याप एफआयआरमध्ये नसल्याकडेही दमानिया आणि कुंभार यांनी लक्ष वेधले. तसेच अजित पवारांचे तब्बल तीन-तीन ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) या प्रकरणात सामील असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या खुलास्यांमुळे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.