मुंबई : (Manikrao Kokate) मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका खरेदी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून, त्यामुळे कोकाटे (Manikrao Kokate) यांची आमदारकीही कायम राहिली आहे.
हेही वाचा : Parth Pawar : पार्थ पवारांच्या सह्यांसह धक्कादायक कागदपत्र उघड, दमानिया-कुंभारांचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री कोट्यातील शासकीय सदनिका मिळवताना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. नंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली; मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता.
हे वाचलात का ? : लाट आहे...
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय पातळीवरही हालचाली वाढल्या. पक्षाध्यक्ष अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडील खाते काढून घेतले आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. दरम्यान, त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर कोकाटे यांना दिलासा मिळाला असून, शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांची आमदारकी अबाधित राहिली आहे.