Kirit Somaiya : मुंबईत २०५१ पर्यंत हिंदू लोकसंख्या चोपन्न टक्क्यांपर्यंत खाली घसरणार

22 Dec 2025 19:39:35




 
Kirit Somaiya
 
मुंबई : (Kirit Somaiya) मुंबईतील अवैध बांगलादेशी घुसखोर आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येचे प्रमाण बदलत असल्याचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सादर केला आहे. या अहवालानुसार मुंबईत २०५१ पर्यंत हिंदू लोकसंख्या चोपन्न टक्क्यांपर्यंत खाली घसरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक्स या माध्यमावर पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. (Kirit Somaiya)
या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, २०५१ पर्यंत मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे तीस टक्क्याने वाढणार असल्याचे सांगितले आहे. कारण मुंबईत होत असलेल्या अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येनुसार, हिंदूंची लोकसंख्या १९६१ पासून ८८% वरून २०११ मध्ये ६६% पर्यंत कमी झाली आहे. १९६१ मध्ये मुस्लिम लोकसंख्या ८% होती ती २०११ मध्ये २१% पर्यंत वाढली आहे. (Kirit Somaiya)
 

हेही वाचा : BMC Elections : महापालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरव्यवहारावर राहणार नजर; आयकर विभागाचा २४x७ नियंत्रण कक्ष कार्यरत 


 
मुंबईला बेकायदेशीर स्थलांतरितांची समस्या पहिल्यापासूनच आहे. टीआयएसएसच्या अंतरिम अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की, मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांच्या वाढत्या संख्येचा शहराच्या सामाजिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. कागदपत्र नसलेले बेकायदेशीर स्थलांतरित बनावट मतदार ओळखपत्र कसे मिळवत होते, हे देखील अहवालात अधोरेखित केले आहे. (Kirit Somaiya)
 

मुंबईतील अनेक स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते वारंवार अवैध घुसखोरीवर आवाज उठवत आहेत. एकिकडे बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार होत असताना मुंबई आणि महाराष्ट्रातील अवैध बांगलादेशी मात्र मोठ्या प्रमाणात त्यांचे बस्तान परिसरात वाढवत आहेत. या अवैध घुसखोरांना इथलेच काही राजकिय लोक मतांसाठी मदत करत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे जनसामांन्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. (Kirit Somaiya)
 

 

Powered By Sangraha 9.0