Gyanesh Kumar : भारताच्या मतदार यादीत फक्त भारतीय नागरिकांचाच समावेश हवा : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

22 Dec 2025 16:35:47
 
Gyanesh Kumar
 
मुंबई : (Gyanesh Kumar) भारताच्या मतदार यादीत केवळ भारतीय नागरिकांचाच समावेश असला पाहिजे, असे ठाम मत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केले. तेलंगणातील बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी मतदार याद्यांचे वेळोवेळी शुद्धिकरण झाले पाहिजे असे सांगितले. त्यासोबतच, संपूर्ण जग भारत आपल्या निवडणुका कशा आयोजित करतो हे उत्सुकतेने पाहत आहे, असेही ते म्हणाले. (Gyanesh Kumar)
 
हेही वाचा :  दिपू चंद्र दासची हत्या करणाऱ्यांना अटक मात्र.....बांगलादेशी लेखिकेचा पोस्टमध्ये खळबळजनक दावा
 
ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) म्हणाले की, SIR च्या पुढील टप्प्यात तेलंगणाचा समावेश केला जाणार असून, यासाठी बिहारमध्ये यशस्वीपणे राबवलेल्या SIR प्रक्रियेचे उदाहरण घ्यावे, बिहारमधील या प्रक्रियेदरम्यान कोणतीही तक्रार नोंदली गेली नाही, पुनर्मतदान किंवा फेरमतमोजणीचीही गरज पडली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि बीएलओचे अभिनंदन केले. बीएलओ हे भारतीय निवडणूक व्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, "मतदार यादी शुद्धीकरणाचे यश त्यांच्या प्रामाणिकपणा, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमांवर अवलंबून आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर संपूर्ण जगाचे लक्ष असते," असेही त्यांनी नमूद केले. (Gyanesh Kumar)
 
हे वाचलात का ?:  Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
 
पुढे ते (Gyanesh Kumar) म्हणाले की, शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी असण्यामागे शहरी मतदारांची उदासीनता हे मुख्य कारण आहे, ग्रामीण भागातील मतदार उत्साहाने मतदान करत देशासमोर आदर्श निर्माण करत आहेत. भारतातील निवडणुका कायद्यांनुसार काटेकोरपणे घेतल्या जातात आणि प्रत्येकाने निवडणूक कायद्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
तसेच, भारत १९९५ मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (IDEA) चा सदस्य झाला आणि तीन दशकांनंतर त्याचे अध्यक्ष झाले, भारतीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात विश्वासार्ह निवडणूक व्यवस्थापन संस्था म्हणून मान्यता मिळवली आहे याचा हा पुरावा आहे, असे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0