BJP Core Committee Meeting : भाजपा कोअर कमिटी बैठक संपन्न

02 Dec 2025 16:29:16
BJP Core Committee Meeting
 
मुंबई : (BJP Core Committee Meeting) आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तारित कोर कमिटी बैठक (BJP Core Committee Meeting)  मंगळवार दि.२ रोजी मुंबई येथे पार पडली.
 
"पक्षाच्या बळकटीसाठी रणनीती आखणे, संघटनात्मक एकता आणि पुढील नियोजन आणि निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली."असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केले.(BJP Core Committee Meeting)
 
हेही वाचा : Eastern Freeway : दक्षिण मुंबई–ठाणे प्रवास फक्त २५ मिनिटांत  
 
या बैठकीस आमदार अमीत साटम, निवडणूक प्रभारी आणि मंत्री आशिष शेलार, राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा ,मुंबईतील भाजपाचे सर्व आमदार, मुंबई भाजपाचे सर्व महामंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते.(BJP Core Committee Meeting)
 
 
Powered By Sangraha 9.0