मुंबई : (Eastern Freeway) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्रीवे) (Eastern Freeway) विस्तारीकरण प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात केली असून छेडानगर–घाटकोपर–आनंदनगर–ठाणे या १३.९० किमी लांबीच्या उन्नत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते ठाणे हे अंतर केवळ २५ मिनिटांत पार करता येईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.(Eastern Freeway)
पूर्व मुक्त मार्गाने २०१३ पासून पी. डी’मेलो रोड ते चेंबूर हा प्रवास वेगवान झाला असला तरी चेंबूरनंतर ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून एमएमआरडीएने ईस्टर्न फ्री-वेचा (Eastern Freeway) विस्तार करण्याची दिशा घेतली. यामुळे दक्षिण मुंबई, चेंबूर, घाटकोपर आणि ठाणे यांच्यातील संपर्क अधिक सुकर होणार आहे.(Eastern Freeway)
विस्तारीकरणाच्या आराखड्यानुसार सहा मार्गिकांचा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार असून यासाठी रमाबाईनगरमधील बाधित झोपड्यांचे स्थलांतर पूर्ण केले आहे. त्यानंतर अखेर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.(Eastern Freeway)
प्राधिकरणाने या प्रकल्पाला गती देण्याचे संकेत दिले असून ठरलेल्या कालावधीत उन्नत रस्ता पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मार्ग पूर्ण क्षमतेने वापरात आल्यावर घाटकोपर-ठाणे दरम्यानचा प्रवास अतिवेगवान होणार आहेच; शिवाय दक्षिण मुंबई–ठाणे हे अंतरही अवघ्या २५ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या (Eastern Freeway) कामाला सुमारे चार वर्षे लागण्याचा अंदाज आहे. उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पूर्व उपनगरांपासून ठाण्यापर्यंतची कनेक्टिव्हिटी अधिक जलद, सुकर आणि नियोजित होणार आहे.(Eastern Freeway)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.