मुंबई : (Thackeray brothers) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, युतीची घोषणा पत्रकार परिषदेत करायची की भव्य मेळाव्यात, यावर दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची अंतिम बैठक नुकतीच पार पडली असून, येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray brothers) यांची थेट भेट होण्याची आणि युतीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Thackeray brothers)
हेही वाचा : आत्मनिर्भर भारत साकारण्यात ‘स्वदेशी’ची महत्त्वाची भूमिका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत निवडणूक तयारीसाठी बैठक घेतली असून, पुणे महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार स्वतः घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या (Thackeray brothers) युतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील आठवड्यातील घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय धक्का देणारी ठरू शकते. (Thackeray brothers)