Mumbai High Court : नागपूरनंतर वांद्रे कोर्ट आणि मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर

18 Dec 2025 13:12:25

Mumbai High Court
 
मुंबई : (Mumbai High Court) नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानंतर आता वांद्रे न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ई-मेल आले आहेत. गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अशाच स्वरूपाचे ई-मेल वांद्रे कोर्ट आणि मुंबई हायकोर्टालाही (Mumbai High Court) आल्याचे समोर आल्याने राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Mumbai High Court)
 
हेही वाचा :  Nagpur District Court : नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
 
माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, धमकी मिळताच पोलिस आणि सुरक्षायंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू करत संबंधित न्यायालय परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाला असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. न्यायालय परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. (Mumbai High Court)
 
हे वाचलात का ?: Sanjay Raut meets Sharad Pawar : राऊतांकडून शरद पवारांची भेट; २० ते २५ मिनिटे चर्चा, नेमकं घडतंय काय?
 
हा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागचा उद्देश काय होता, तसेच ही धमकी खरी आहे की अफवा, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सध्या तरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. या घटनेमुळे काही काळ न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र पोलिस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. (Mumbai High Court)
 
 
Powered By Sangraha 9.0