Sanjay Raut meets Sharad Pawar : राऊतांकडून शरद पवारांची भेट; २० ते २५ मिनिटे चर्चा, नेमकं घडतंय काय?

    18-Dec-2025
Total Views |
 
Sanjay Raut meets Sharad Pawar
 
मुंबई : (Sanjay Raut meets Sharad Pawar) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sanjay Raut meets Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुंबईतील शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली असून, दोघांमध्ये सुमारे २० ते २५ मिनिटे सखोल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. (Sanjay Raut meets Sharad Pawar)
 
हेही वाचा :  Ram Sutar Passes Away : शिल्पकलेतील राम हरपला; महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. ही भेट पूर्णपणे राजकीय असून, मुंबई महापालिकेतील जागावाटप आणि आगामी निवडणूक रणनीतीवर चर्चा झाल्याचे माध्यमांवरून समजत आहे. (Sanjay Raut meets Sharad Pawar)
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी, शरद पवार (Sanjay Raut meets Sharad Pawar) ठाकरे बंधूंशी युती करण्यास अनुकूल असल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. त्याच अनुषंगाने ही भेट पूर्वनियोजित असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच संजय राऊत यांनी झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत देखील या भेटी संदर्भात सांगितले होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भूमिका, संभाव्य युती आणि जागावाटप यावर पुढील काही दिवसांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut meets Sharad Pawar)