मुंबई : ( Bollywood Wedding Collection ) आदित्य बिर्ला लाइफस्टाइल ब्रँड्स लिमिटेडच्या अधिपत्याखालील प्रसिद्ध पुरुष परिधान ब्रँड पीटर इंग्लंडने भारतीय विवाह सोहळ्यांसाठी खास तयार केलेले ‘द बॉलिवुड वेडिंग कलेक्शन’ लाँच केले आहे. या कलेक्शनच्या प्रचार मोहिमेत चित्रपट निर्माता व स्टाइल आयकॉन करण जोहर आणि अभिनेता रोहित सराफ सहभागी झाले आहेत.
भारतीय विवाहांमधील भव्यता, भावना आणि साजरेपणाला समकालीन फॅशनची जोड देत आधुनिक नवरदेवासाठी हे कलेक्शन सादर करण्यात आले आहे. सिनेमॅटिक स्टाइल, ग्लॅमर आणि वैयक्तिक अभिव्यक्ती यांचा संगम या कलेक्शनमध्ये दिसून येतो.
या लाँचविषयी बोलताना पीटर इंग्लंडचे चीफ बिझनेस ऑफिसर अनिल एस. कुमार म्हणाले,
हेही वाचा : Smart City : स्मार्ट सिटी मोहिमेला मोठे यश
“आजचे भारतीय विवाह केवळ विधी नसून ते एक भव्य सेलिब्रेशन असते. ‘द बॉलिवुड वेडिंग’ कलेक्शनद्वारे आम्ही पुरुषांच्या वेडिंग वेअरमध्ये नव्या शैलीची भर घातली आहे. करण जोहर यांची नाट्यमय, भव्य शैली आणि रोहित सराफ यांची आधुनिक, भावनिक ओळख — या दोघांचे संयोजन आजच्या नवरदेवासाठी परिपूर्ण आहे.”
बॉलिवुडमधील गाजलेल्या विवाह प्रसंगांपासून प्रेरणा घेत या कलेक्शनमध्ये डबल-ब्रेस्टेड सूट्स, स्कल्प्टेड जॅकेट्स, जॅक्वार्ड शाइन, वेल्वेट टेक्स्चर्स यांचा समावेश आहे. पॉलिस्टर, विस्कोस आणि स्पॅन्डेक्सच्या मिश्रणातून तयार केलेल्या या पोशाखांना परिपूर्ण फिट आणि आकर्षक लूक देण्यात आला आहे.