Eknath Shinde : "हे देशप्रेम नसून पाकिस्तान प्रेम...": उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

17 Dec 2025 16:35:14
 
Eknath Shinde
 
मुंबई : (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करत, “हे देशप्रेम नसून पाकिस्तान प्रेम आहे,” असा घणाघाती आरोप केला आहे. पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी कधीही माफ करणार नाहीत, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. (Eknath Shinde)
 
हेही वाचा :  Navnath Ban : ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात त्यांची जागा वाटप करून काही साध्य होणार नाही - नवनाथ बन
 
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याबद्दल शिंदे यांनी लष्कराचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले,” असे ते (Eknath Shinde) म्हणाले.
 
हे वाचलात का ?: Prithviraj Chavan: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपला पराभव झालाच आहे! या वक्तव्यावर मी माफीही मागणार नाही : पृथ्वीराज चव्हाण  
 
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून होणारी वक्तव्ये अत्यंत चिंताजनक, दुर्दैवी आणि देशविघातक असल्याची टीका शिंदे यांनी केली. राहुल गांधी, पी. चिदंबरम आणि आता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढे ते (Eknath Shinde) म्हणाले, “अशा प्रकारची वक्तव्ये म्हणजे देशप्रेम नव्हे, तर थेट पाकिस्तान प्रेम आहे, देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनता योग्य धडा शिकवेल.” (Eknath Shinde)
 
Powered By Sangraha 9.0