Navnath Ban : ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात त्यांची जागा वाटप करून काही साध्य होणार नाही - नवनाथ बन

    17-Dec-2025
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आला आहे .त्यांनी जागा वाटप केले काय की नाही केले काय त्याचा काही फरक पडणार नाही. मुंबईकर टप्प्या टप्प्याने उबाठा आणि मनसेचा कार्यक्रम करणार आहेत.यावेळी सामान्य मुंबईकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपा महायुतीला आशीर्वाद देणार आहेत. मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल."असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी बुधवार दि.१७ रोजी नरिमन पॉईंट,मुंबई येथे केले.
 
"मुंबई कुणाच्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही.आजपर्यंत स्वतःची जहागीर समजून ज्यांनी मुंबईचा वापर केला त्यांना सामान्य मुंबईकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.घर हे भिंतीवर आधारलेले नसते तर विचारांवर आधारलेले असते. (Navnath Ban) ज्यांना विचार आणि आचारच नाहीत त्यांनी मुंबईला घर म्हणण्याच्या गप्पा करू नयेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आहेत.आणि काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष नेऊन बांधला."असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
 
" जे सरकार जनतेच्या आशीर्वादावर आले त्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणणे हास्यास्पद. ज्यांनी घरात बसून फेसबुक लाइव्ह केले त्यांचे सरकार खरे टेस्ट ट्यूब बेबीचे होते.महायुतीचे सरकार हे जनतेचे लाडके बाळ आहे.९० जागा लढवून ज्यांच्या २० जागा आल्या ते बेबी आहेत." असे स्पष्टीकरण बन (Navnath Ban) यांनी दिले.(Navnath Ban)
 
हेही वाचा : महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश 
 
"खुर्ची मिळावी यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना सोबत घेत आहेत.आदित्य ठाकरेंनी मनसेला संपलेला पक्ष म्हटले होते.अग्रलेखातून वारंवार राज ठाकरेंवर संजय राऊत टीका करायचे.राज ठाकरेंनी सावध राहावे कारण पाठीत खंजीर खुपसण्याचा उबाठाचा इतिहास आहे. अफजल खानाचा डी एन ए पुढे चालवण्याचे काम राऊत करत आहेत.उबाठाची सत्ता आली तर मुंबईचा महापौर सय्यद किंवा खान होईल." अशी टीका बन (Navnath Ban) यांनी केली.(Navnath Ban)
 
"मंत्रिमंडळाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.चौकशी होईल आणि चूक असेल तर कारवाई पण निश्चित आहे.हे सरकार पारदर्शक आहे.आणि कायद्याने चालणारे आहे. घेतलेल्या निर्णयावर हे सरकार ठाम असते." असे स्पष्टीकरण नवनाथ बन (Navnath Ban) यांनी दिले.