मुंबई : (Ashish Shelar) पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिंदे गटावर केलेल्या टीकेला भाजप नेते व मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाला “टेस्ट ट्यूब बेबी” असे संबोधणाऱ्या राऊतांच्या वक्तव्यावर शेलार यांनी विनोदी शैलीत निशाणा साधला आहे.
हेही वाचा : Eknath Shinde : "हे देशप्रेम नसून पाकिस्तान प्रेम...": उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, संजय राऊतांच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र, त्यांनी एक सवाल उपस्थित करत, ते म्हणाले, “तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात, तरी शिवतीर्थावरचा चाफा ना डोलेना, ना बोलेना.” शिवतीर्थावर वारंवार जाण्यामागे नेमका हेतू काय, मनधरणी सुरू आहे की पायधरणी, याचा खरा अर्थ राऊतांनी स्पष्ट करावा. (Ashish Shelar)
हे वाचलात का ?: Navnath Ban : ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात त्यांची जागा वाटप करून काही साध्य होणार नाही - नवनाथ बन
पुढे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, जेव्हा शिवसेना भाजपसोबत युतीत होती, तेव्हा चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर बोलावले जात असे. मात्र आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांची तीच अकड कुठे गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Ashish Shelar)