Parth Pawar Mundhwa Land Scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी, पोलिसांकडून दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

15 Dec 2025 13:21:10

 
Parth Pawar Mundhwa Land Scam

मुंबई : (Parth Pawar Mundhwa Land Scam) पार्थ पवार मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्यासोबतच ते हजर न राहिल्यास पुणे पोलीस त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे देखील माध्यमांवरून समजत आहे. (Parth Pawar Mundhwa Land Scam)
हेही वाचा : Dr. Mohanji Bhagwat : संघ स्वस्थ समाज आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य करतो

या जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar Mundhwa Land Scam) आणि त्यांच्या कंपनीत भागीदार असलेले, दिग्विजय पाटील हे चांगलेच अडचणीत सापडत असल्याच पाहायला मिळत आहे. आता या प्रकरणी दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बावधान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आले असून, या प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Parth Pawar Mundhwa Land Scam) 

हे वाचलात का ?: BMC Elections : महापालिका निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता! आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार

मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळाप्रकरणातील प्रथम आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील आणखी एक आरोपी रवींद्र तारुला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बावधन पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली होती. (Parth Pawar Mundhwa Land Scam)

Powered By Sangraha 9.0