Devendra Fadnavis : फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL! ; मुख्यमंत्री फडणवीस

15 Dec 2025 12:36:39



 Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ करण्यात आला.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, लिओनेल मेस्सी सारख्या महान खेळाडूचे स्वागत करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काही वर्षात फुटबॉल मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या, आमच्या ६० मुलांना ते मार्गदर्शन करत आहेत, जे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या माध्यमातून आपल्या राज्यात फुटबॉलला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले जात असून, आमच्या ६० उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा दिल्याबद्दल लिओनेल मेस्सी यांचे मनःपूर्वक आभार. (Devendra Fadnavis)
 

हेही वाचा :  श्रमाची गोमटी फळे!


 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, 'प्रोजेक्ट महादेवा' हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. तसेच हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर व इतर मान्यवर देखील उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
 

 
Powered By Sangraha 9.0