BMC Elections: राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं! १५ जानेवारीला महापालिका निवडणुका होणार: आयुक्त दिनेश टी. वाघमारे

15 Dec 2025 16:47:04
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) राज्यातील मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ला होणार. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकींचे मतदान १५ जानेवारीला होणार असून निकाल १६ जानेवारीला लागणार, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश टी. वाघमारे यांनी केली. त्यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेतल्या जाणार असल्याच देखील ते म्हणाले. (BMC Elections)
 
 हेही वाचा : Local Body Election Results : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर डाव्यांचा उन्माद
 
महापालिका निवडणुकींसाठी (BMC Elections) महत्त्वाच्या तारखा कोणत्या?
 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात - २३ डिसेंबर २०२५
 
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - ३० डिसेंबर २०२५
 
अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर २०२५
 
अर्ज मागे घेण्याची मुदत - २ जानेवारी २०२६
 
निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी - ३ जानेवारी २०२६
 
मतदान - १५ जानेवारी २०२६
 
मतमोजणी - १६ जानेवारी २०२६
 
 
Powered By Sangraha 9.0