Local Body Election Results : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर डाव्यांचा उन्माद

केरळमध्ये ठिकठिकाणी सीपीआय कार्यकर्त्यांकडून हिंसाचार

Total Views |
 Local Body Election Results

मुंबई : (Local Body Election Results) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत (Local Body Election Results) अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यांत विविध ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. यामध्ये तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत पराभव झाल्यामुळे जिल्ह्यातील नेय्याटिंकारा इथे सीपीआय-एमच्या कार्यकर्त्यांकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. यामध्ये ३० ते ४० भाजप कार्यकर्ते जखमी झाले. तर केरळमधील अन्य ठिकाणी काँग्रेस कार्यालय व विजयी मिरवणुकांवर हल्ले करण्यात आले.(Local Body Election Results)
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील एरामाला येथील काँग्रेस कार्यालय असलेल्या इंदिरा गांधी भवनवर सीपीआय(एम) च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. सुमारे २०० लोकांनी धोकादायक शस्त्रे घेऊन काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या हल्ल्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या तिथे असलेल्या पुतळ्याचेही नुकसान करण्यात आले.(Local Body Election Results)
 
हेही वाचा : Lionel Messi : प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी मुंबईत
 
राज्यातील मराड येथे काँग्रेसप्रणीत यूडीएफच्या विजयानंतर मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर देखील डाव्यांनी दगडफेक केल्याने अनेक जण जखमी झाले. पनूर येथे देखील यूडीएफच्या विजयी रॅलीत अनेक सीपीआय कार्यकर्ते तलवारी आणि कोयते घेऊन घुसल्याने मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक यूडीएफ नेते जखमी झाले.(Local Body Election Results)
 
फटाके फोडण्यास देखील विरोध
 
वायनाड जिल्ह्यातील सुलतान बाथेरी येथे काँग्रेसचे कार्यकर्ते फटाके फोडत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसेच एक काँग्रेस कार्यकर्त्याच्या (Local Body Election Results)कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणाऱ्या कारवर सुमारे ४० सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या सर्व घटनांची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. परंतु हे राज्य सरकार पुरस्कृत हल्ले असल्याचे बोलले जात आहे.(Local Body Election Results)
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.