भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बॅनरचीच चर्चा

14 Dec 2025 19:19:45

Ravindra Chavan
 
डोंबिवली : ( Ravindra Chavan ) डोंबिवलीत भाजपाकडून लावण्यात आलेला बॅनर हा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. आता भाजपा आणि शिवसेना यांच्यात सारेकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. युतीचे संकेत ही देण्यात आले आहेत. त्यामुळे बॅनरवर दिलेला संदेश नेमका कोणाला उद्देशाने आहे याबाबत शहरात चर्चा रंगली आहे.
 
हेही वाचा : १ जुलैपर्यंत कर्जमाफीबाबत घोषणा करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी सत्यनारायणाची महापूजा आणि आई गावदेवी मातेचा अभिषेक सोहळयाचे आयोजन केले होते. यावेळी भंडाऱ्याचा देखील नागरिकांनी आस्वाद घेतला. यावेळी भाजपा माजी नगरसेविका रविना माळी, अमर माळी, प्रसाद माळी, विकास देसले, अर्जुन बुवा चौधरी उपस्थित होते.
 
या कार्यक्रमादरम्यान भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा फोटो असलेला बॅनर चर्चेचा ठरला होता. बॅनरवर ‘‘इस बार जवाब हि ऐसा देंगे, फिर कभी सवाल ही नही उठेगा..!’’असा आशय टाकलाय. त्यामुळे सदर आशय कोणासाठी आहे अशा चर्चा शहरात रंगल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0