मुंबई : (Ram Mandir) अयोध्येत राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन ३१ डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. या खास प्रसंगाला 'प्रतिष्ठा द्वादशी' असे नाव देण्यात आले असून यावेळी राम मंदिर (Ram Mandir) परिसरातील सात लहान मंदिरांच्या शिखरांवर ध्वजारोहन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Ram Mandir)
हेही वाचा : भारत-अमेरिका संबंध आणि सर्जिओ गोर यांची भूमिका
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर रोजी मुख्य राम मंदिराच्या (Ram Mandir) शिखरावर ध्वजारोहण केले होते. त्यावेळी या सात मंदिरांवरही ध्वजारोहण करण्याचे नियोजन होते, परंतु त्यांचे बांधकाम आणि सजावट पूर्ण झाली नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. (Ram Mandir)
सध्या परिसरातील सातही मंदिरांचे काम पूर्ण झाले आहे. या सात मंदिरांमध्ये शिव, सूर्य, गणपती, हनुमान, भगवती, अन्नपूर्णा आणि शेषावतार (लक्ष्मण) या मंदिरांवर ध्वजारोहन करण्यात येईल. यासाठी धार्मिक विधी आणि समारंभ २७ डिसेंबर पासूनच सुरू होतील. (Ram Mandir)