Osman Hadi : बांग्लादेशातील कट्टर इस्लामवादी उस्मान हादीवर अज्ञातांकडून हल्ला

13 Dec 2025 13:53:26
Osman Hadi
 
मुंबई : (Osman Hadi) कट्टर इस्लामवादी विचारांसाठी ओळखला जाणारा आणि समाजमाध्यमांवर भारतविरोधी पोस्ट करणारा उस्मान हादी (Osman Hadi) याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार केल्याची घटना समोर आली. ढाकामधील पलतान परिसरात ही घटना घडली असून प्रकृती गंभीर असल्याने हादीला (Osman Hadi) खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
 
बांग्लादेशातील शेख हसीना यांच्याविरोधात चळवळ उभी करण्यात उस्मान हादी यांची प्रमुख भूमिका होती. त्या चळवळीत त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून काम पाहिले होते. २०२४ च्या जुलै-ऑगस्टमधील आंदोलनानंतर अवामी लीगला सत्तेवरून हटवण्यात आले. त्यानंतर उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या नेतृत्वात इन्किलाब मंचची स्थापना झाली.
 
हेही वाचा :  युद्धात निश्चित केलेले लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर युद्ध थांबवायचे असते
 
काही दिवसांपूर्वीच उस्मान हादी (Osman Hadi) यांनी फेसबुकवर भारताचा ईशान्येकडील काही भाग बांग्लादेशात दाखवणाऱ्या नकाशाची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच बांग्लादेशातील आगामी निवडणुकीत आवामी लीगला परवानगी नाकारल्याने हा हल्ला झाल्याची शंका घेतली जात आहे. (Osman Hadi)
 
बांगलादेशात १२ फेब्रुवारीला निवडणुका
 
बांगलादेशात पुढील वर्षी १२ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ए. एम. एम. नसीरुद्दीन यांनी गुरुवारी संध्याकाळी ही घोषणा केली. शेख हसीना यांचा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या अवामी लीगला आगामी निवडणुका लढवण्याची परवानगी दिली जाणार नाही. (Osman Hadi)
 
 
Powered By Sangraha 9.0