Mangal Prabhat Lodha : स्नेहभोजन आणि गायन , गप्पा

13 Dec 2025 13:47:05

नागपूर : (Mangal Prabhat Lodha) मंगळवार दि.९ रोजी संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी नागपूर येथे हुरडा पार्टी आयोजित केली होती. या हुरडा पार्टीत आमदार अमित गोरखे यांनी 'तुझी चाल तुरुतुरु'हे गीत सादर केले ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसून दाद दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांच्या हुरडा पार्टीत आशिकी चित्रपटातील गाणे गायले जावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही गीत सादर केले. तसेच मंत्री नरहरी झिरवळ ,मंत्री प्रताप सरनाईक त्याच पद्धतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा पत्रकारांसाठी व मान्यवरांना अशा पद्धतीचे स्नेहभोजन आयोजित केले होते.ज्यामध्ये काही ठिकाणी गायनाचे सुद्धा कार्यक्रम झाले. दिवसभराच्या कामातून हा एक विरंगुळा चर्चेचा विषय ठरला.
 
हेही वाचा :  भारतातील पहिल्या ‘रेड टेबल-टॉप मार्किंग’ची अंमलबजावणी

अनेकदा अधिवेशन काळात मंत्र्यांचे (Mangal Prabhat Lodha) आणि आमदारांचे येणे जाणे विधान भवन परिसरात एकाच वेळी होत असल्याने अनेक पत्रकारांची धावपळ दिसून आली. अधिवेशन काळात एकमेकांवर ताशेरे ओढणारे विरोधक अन सत्ताधारी आमदार, मंत्री, सदनाच्या बाहेर मात्र निखळ गप्पा मारताना दिसले. काहीजण पत्रकारांसोबत विनोद करत असताना दिसले.मुंबईतील घरा संदर्भात प्रश्न मांडत असताना आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवार दिनांक १२ रोजी 'कुणी घर देता का घर 'ही कविता वेगळ्या स्वरूपात सादर केली ज्याला सर्व सदस्यांनी दाद दिली. विधान परिषदेत सुरवातीच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी हिंदी डायलॉग सुद्धा ऐकवला ज्याला उपस्थित सदस्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. (Mangal Prabhat Lodha)
 
हेही वाचा :  Navnath Ban : महाविकास आघाडीत अंतर्गत सर्कस : नवनाथ बन


१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बरेच आमदार विधान भवन अधिवेशनात गैरहजर दिसले. (Mangal Prabhat Lodha)
 
विधान परिषदेत बोलत असताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शुक्रवार दि.१२ रोजी माईक चा शॉक लागला . त्यावर त्यांचे मित्र प्रवीण दरेकर यांनी तुम्हाला काय झाले तर तुमचे पुतळे उभे करू अशी विनोदी टिप्पणी केली. तर मला काय झाले तर राज्याचे नुकसान होईल असे लाड म्हणाले. तर तुम्ही सभागृहाचे लाड तुम्हाला काही होऊ देणार नाही असे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले,तर याची एस आय टी चौकशी करा अशी टिपण्णी अनिल परब यांनी केली. (Mangal Prabhat Lodha)
 

 

Powered By Sangraha 9.0