Navnath Ban : महाविकास आघाडीत अंतर्गत सर्कस : नवनाथ बन
13-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Navnath Ban)"महाविकास आघाडी म्हणजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा असे असून सर्कस विधिमंडळात नाही, महाविकास आघाडीच्या तंबूत सुरू आहे. काँग्रेस स्वबळाची घोषणा करून उबाठाला वाऱ्यावर सोडते आहे यातून मविआमध्ये नेतृत्व नव्हे, लाथाळ्या सुरू आहेत." अशी टीका भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शनिवार दि.१३ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय,मुंबई येथे केली.
"जनतेने उबाठा गटाला इतकं नाकारलं की विरोधी पक्षनेताही मिळाला नाही.९० जागा लढून फक्त २० आमदार, मग कशावर दावा करत आहेत. विरोधी पक्षनेता पद संख्येवर मिळतं असत.विरोधी पक्षनेता द्यायचा की नाही हे जनता ठरवत असते सत्ताधारी नाही. उबाठा गटाची पात्रता जनतेने निवडणुकीत दाखवली असून जनतेचा कौल मान्य करण्याऐवजी त्यांच रडगाणं सुरू आहे." असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
"जय जय महाराष्ट्र माझा वर चर्चा झाली तर काँग्रेसचा काळा इतिहास उघड होईल. यातून १०७ मराठी हुतात्म्यांवर गोळ्या झाडणारी काँग्रेस उघडी पडेल.वंदे मातरम प्रमाणेच काँग्रेसचा बुरखा फाटेल आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांचा दुटप्पीपणा समोर येईल.मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे विदर्भाचा झपाट्याने विकास होत असून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आता अजेंड्यावरच नाही." असेही ते म्हणाले. (Navnath Ban)
"रवींद्र चव्हाण आर एस एस चे स्वयंसेवक आहेत, ते शिवसैनिक नव्हतेच. खोटं बोलणं हेच संजय राऊतांच राजकारण असून शिवसेनेचा एकही पुरावा द्यावा असे खुलं आव्हान अम्ही करतो.स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेले नेतृत्व म्हणजे रविंद्र चव्हाण आहेत." (Navnath Ban)
"ठाकरे बंधू एकत्र आले तरी निकाल शून्यच लागणार आहे. दोन शून्यांची बेरीज कधीच एक होत नाही. महायुतीचा भगवा मुंबईत आणि राज्यात फडकणार असून उबाठाची अवस्था महाराष्ट्राने आधीच पाहिली आहे.पण नवाब मलिक यांच्यासोबत युतीला आमचा स्पष्ट नकार असून राष्ट्रविरोधी आरोप असलेल्यांना भाजप पाठिंबा देणार नाही.यात तडजोड नाही अशी भाजपची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे." असे बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.