Ajit Pawar : अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे अपेक्षित होते; मुंढवा जमीन घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

13 Dec 2025 16:14:59
Ajit Pawar
 
नागपूर : (Ajit Pawar) मुंढवा येथील जमीन व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे आणि चुकीच्या बाबी आढळल्यास कारवाई करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच 'मुद्रांक सुधारणा विधेयक' पार्थ पवारांना वाचवण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
अमेडिया कंपनीशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारने मुद्रांक सुधारणा विधेयक आणले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. दरम्यान, शनिवारी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे आरोप फेटाळून लावले. हे विधेयक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी नसून, मुद्रांक आणि नोंदणी विभागातील तक्रारी थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी याव्यात, यासाठी आहे, असे त्यांनी सांगितले.
 
हेही वाचा :  Rashtriya Swayamsevak Sangh : संघ ही प्रतिक्रियावादी शक्ती नाही
 
ते पुढे म्हणाले की, "व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे आणि चुकीच्या बाबी आढळल्यास कारवाई करणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांनी वेळीच भूमिका घेतली असती तर पुढचे प्रकार घडले नसते." (Ajit Pawar)
 
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांची बैठक घेतली. त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही पक्षांना वाद वाढवू नये, अशी विनंती केल्याचेही त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0