Rashtriya Swayamsevak Sangh : संघ ही प्रतिक्रियावादी शक्ती नाही

तिरुचिरापल्ली येथे "१०० वर्षे संघ प्रवास - नवे क्षितिज" या कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन

Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) संघाची स्थापना मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कोणाच्या विरोधासाठी झाली नाही, तर हिंदूंच्या संघटनेसाठी झाली. संघ समाजाचे संघटन करतो. कोणाचाही विरोध करत नाही. कारण संघ ही प्रतिक्रियावादी शक्ती नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे "१०० वर्षे संघ प्रवास - नवे क्षितिज" या कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.(Rashtriya Swayamsevak Sangh)
 
सरसंघचालक म्हणाले की, संघ हिंदू समाजाला बळकटी देण्याचे आपले कार्य शांतपणे करणे पसंत करतो. हिंदूंचे संघटन करणे म्हणजे इतरांचा विरोध करणे होत नाही. उदाहरणादाखल त्यांनी सांगितले की, ज्यापद्धतीने व्यायाम आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतो म्हणून आपण करतो, एखाद्यावर हल्ला करण्यासाठी नाही. त्याचप्रकारे संघाचे कार्य चाललेले असते.(Rashtriya Swayamsevak Sangh)
 
हेही वाचा : Devendra Fadnavis : जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
 
ते म्हणाले की, हिंदू म्हणून ओळख असलेल्यांवर धर्माचे रक्षण करण्याची, समाजाचे रक्षण करण्याची आणि भारताने जगात आध्यात्मिक योगदान द्यावे याची जबाबदारी आहे. संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्य फक्त हिंदू समाज संघटित करणे आहे. एकदा समाज संघटित झाला की संघ फक्त समाजासोबत चालेल.(Rashtriya Swayamsevak Sangh)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.