साताऱ्याचे साहित्य संमेलन होणार 'डिजिटल'

13 Dec 2025 16:09:01
99th Marathi Literary Meet in Satara
 
मुंबई : ( 99th Marathi Literary Meet in Satara ) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. मराठ्यांची राजधानी, अर्थात साताऱ्यामध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार असून, सध्या या संमेलनाच्या तयारीची लगबग सुरु आहे. प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असून, हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा वेगळे असणार असल्याचे बोलले जात आहे. सदर कार्यक्रमाची संपूर्ण माहितीपत्रिका थोड्याच दिवसांमध्ये प्रकाशित होणार असून हे साहित्य संमेलन आपल्या डिजिटल स्वरुपामुळे पूर्वीच्या संमेलनांपेक्षा वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
हेही वाचा : मेनका सोनींची अमेरिकेतील रेडमंड सिटी कौन्सिलवर निवड
 
या संदर्भात माहिती देताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना म्हणाले की " साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होणारी स्मरणिका डिजिटल स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. याचबरोबर संमेलनातील काही कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रसारीत होणार आहे." महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनतर्फ १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या या साहित्यसंमेलनात माजी साहित्य संमेलनाध्यक्षांचा तसेच साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यीकांचा सुद्धा या वेळी सन्मान केला जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0