मेनका सोनींची अमेरिकेतील रेडमंड सिटी कौन्सिलवर निवड

भगवद्गीता हातात घेऊन घेतली शपथ

    12-Dec-2025   
Total Views |
Menka Soni
 
मुंबई : ( Menka Soni ) लखनौच्या सरोजनीनगरमध्ये राहणाऱ्या मेनका सोनी यांची अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील रेडमंड शहराच्या सिटी कौन्सिलच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे. हे यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या प्रवासी भारतीय-अमेरिकन महिला ठरल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय पारंपरिक वेशभूषेत, हातात भगवद्गीता घेऊन शपथग्रहण केल्याने त्या खास चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यामार्फत अमेरिकेत भारतीय संस्कृतीचा प्रसार लवकरच होईल असा विश्वास निर्माण झाला आहे.
 
लखनौ येथे पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, मला भारतीय संस्कृती आणि परंपरांचा खूप जिव्हाळा आहे. मी विदेशात राहूनही त्या जपल्या आहेत. होळी-दिवाळी देखील मी अमेरिकेतील लोकांसोबत साजरी करते. होळीच्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजार लोक उपस्थित होते. मी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलांसाठी पुढे काम करणार आहे.
 
मायक्रोसॉफ्ट, स्टारबक्स, जनरल मोटर्स, टी-अँड-मोबाइल यांसारख्या कंपन्यांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळण्याचा आणि कॉर्पोरेट क्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी १४ वर्षांपूर्वी ‘एम पावरिंग’ नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. तिच्यामार्फत महिलांचे सशक्तीकरण, बेघर लोकांना मदत, तसेच आजारी लोकांची सेवा यांसाठी काम केले. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना मदत करण्यात आली आहे. २०२४ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला होता. यूएस काँग्रेसने त्यांना २० प्रभावशाली महिलांमध्ये समाविष्ट करून सन्मानित केले होते.
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक