Pardhi Samaj : पारधी समाजासह आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रश्नांवर रवीभवनात सविस्तर चर्चा

    12-Dec-2025
Total Views |
Pardhi Samaj
 
नागपूर : (Pardhi Samaj) आदिवासी समाजाच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली रवीभवन येथे संपन्न झाली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद – विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित या बैठकीत परिषदेचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.(Pardhi Samaj)
 
बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, मुख्य अभियंता डाबे, अपर आयुक्त आयुषी सिंह, अपर आयुक्त जितेंद्र चौधरी आणि उपायुक्त डिगंबर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भ अध्यक्ष सूर्यकांत उईके यांच्यासह परिषद पदाधिकारीही उपस्थित होते.(Pardhi Samaj)
 
हेही वाचा : Maharashtra Weather Update : थंडीचा जोर वाढला; महाबळेश्वरमध्ये 12.2 तर कल्याणचा 12.8 आणि डोंबिवलीचा पारा 13.4अंशांवर
 
पारधी समाजासह (Pardhi Samaj) शिक्षणापासून वंचित समुदायांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ मिळावा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्फत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात पारधी समाजाला प्राधान्य, प्रत्येक जिल्ह्यात १० विद्यार्थ्यांसाठी कोटा, शैक्षणिक पात्रतेत शिथिलता, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विशेष महसूल शिबिरे, पारधी बेड्यांवरील जनजागृती, आर्थिक सहाय्य आणि संस्कृती–परंपरांवरील संशोधन या महत्त्वाच्या सूचनांवर चर्चा झाली. बोगस जात प्रमाणपत्र रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही मांडण्यात आली.(Pardhi Samaj)
 
डॉ. उईके यांनी सर्व प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आदिवासी समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.(Pardhi Samaj)