Sharad Pawar's Pre-Birthday Dinner: राहुल गांधी गौतम अदानी एकत्र? शरद पवारांच्या वाढदिवसाच्या पार्टीत कोणत्या पाहुण्यांची उपस्थिती?

11 Dec 2025 12:47:55
 
Sharad Pawar
 
दिल्ली : (Sharad Pawar's Pre-Birthday Dinner) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा काही दिवसातच ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने काल बुधवार दि. १० डिसेंबर रोजी, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खाजगी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते आणि व्यावसायिक एकत्र आले होते. आता त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्या असल्याच देखील माध्यमांवर म्हटलं जात आहे. (Sharad Pawar's Pre-Birthday Dinner)
 
या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगपती गौतम अदानी, तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, भाजप नेते डी. पुरंदरेश्वरी, भाजप प्रवक्ते नलिन कोहली, काँग्रेस नेते पवन खेडा, केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू, नेते प्रफुल पटेल आणि मंत्री सुनील तटकरे यांच्यासह अनेक खासदार देखील उपस्थित होते. (Sharad Pawar's Pre-Birthday Dinner)
 
हेही वाचा :  Karachi : कराचीमध्ये स्वतंत्र सिंधूदेशाच्या मागणीसाठीचे आंदोलन हिंसक वळणावर
 
मात्र, या कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी हा कार्यक्रम पूर्णता खासगी होता, याचा राजकारणाशी काही संबंध नसल्याच म्हटलं आहे. काँग्रेस नेते पवन खेडा हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "राजकारण सर्वत्र असू नये. समाज परस्पर संबंधांवर भरभराटीला येतो. समाज राजकारणावर चालत नाही. राजकारण समाजावर चालते." (Sharad Pawar's Pre-Birthday Dinner)
 
जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनीही शुभेच्छा देताना म्हटले आहे की, "आदरणीय शरद पवार यांना ८५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देव त्यांना निरोगी ठेवो आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचे योगदान चालू ठेवण्यासाठी त्यांना शक्ती देवो." (Sharad Pawar's Pre-Birthday Dinner)
 

 
Powered By Sangraha 9.0