मुंबई : (Karachi) कराचीमध्ये (Karachi) सिंधुदेशच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर येथील परिस्थिती चांगलीच बिघडली. सिंधी कल्चर डेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून सिंधच्या स्वातंत्र्याची मागणी करू लागले. जिये सिंध मुत्ताहिदा महाज (जेएसएसएम) या संघटनेच्या गटाने पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत सिंधच्या मुक्तीची जोरदार मागणी केली. सिंध प्रदेश, जो इंडस (सिंधू) नदीच्या आसपासचा भाग आहे, १९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेला. महाभारताच्या काळात यालाच सिंधुदेश म्हणत असत. आज तो पाकिस्तानचा एक मोठा प्रांत आहे.(Karachi)
परिस्थिती तेव्हा हाताबाहेर गेली जेव्हा प्रशासनाने रॅलीचा मार्ग बदलला. यामुळे हजारो आंदोलनकर्ते संतापले. काहींनी दगडफेक सुरू केली, तर आजूबाजूची मालमत्तांची देखील तोडफोड करण्यात आली. पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. स्थानिक वृत्तांनुसार, किमान ४५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.(Karachi)
सिंधुदेशची मागणी नवी नाही. १९६० च्या दशकाच्या शेवटी सिंधचे माजी शिक्षण मंत्री जी.एम.सैयद; जे सुरुवातीला पाकिस्तानच्या निर्मितीचे समर्थक होते त्यांनी कालांतराने स्वतंत्र सिंधची मागणी सुरू केली. १९७१ मधील बांग्लादेश निर्मितीनंतर हा विचार आणखी मजबूत झाला. बंगाली चळवळीतून प्रेरणा घेऊन अनेक सिंधींनी आपल्या सांस्कृतिक–राजकीय संघर्षासाठी स्वतंत्र देशाची मागणी पुढे ढकलली.(Karachi)
सिंधी संघटना बराच काळ प्रादेशिक दडपशाही व मानवाधिकार उल्लंघनांच्या तक्रारी करत आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला, निर्वासित नेते शफी बुरफट यांच्या नेतृत्वाखालील जेएसएसएमने संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करून सिंधुदेशाला स्वतंत्र देश घोषित करण्याची विनंती केली. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदतीसाठी संपर्क साधला, कारण सिंध आणि भारत यांचे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक नातेसंबंध खोल आहेत.(Karachi)
सिंधुदेशाचा मुद्दा पुन्हा का चिघळला?
सिंधमधील राजकीय घडामोडींमुळे सिंधुदेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. मध्यंतरी झालेल्या एका पाकिस्तानी टेलिव्हिजन चर्चेत एका पत्रकाराने सांगितले की, एमक्यूएमचे नेते अल्ताफ हुसेन यांनी माजी गृहमंत्री झुल्फिकार मिर्झा यांना सांगितले होते की १८ व्या घटनादुरुस्तीनंतर 'सिंधुदेशचा मुद्दा आता आपल्या हातात आला आहे.' भारतामध्ये हा मुद्दा तेव्हा पुढे जेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सिंधचा प्रकर्षाने उल्लेख केला. गुजरातमधील एका सिंधी समाज कार्यक्रमात त्यांनी १९४७ च्या फाळणीनंतर सिंध पाकिस्तानात गेल्यामुळे अनेक सिंधी हिंदूंना झालेला वेदनादायक अनुभव सांगितला. त्यादरम्यान त्यांनी सिंध एक दिवस भारतात परत येईल, असा उल्लेख केला होता.(Karachi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक