मुंबई : (Raj Thackeray) २००८ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलन प्रकरणाची सुनावणी आज गुरूवार दि. ११ डिसेंबर रोजी ठाणे रेल्वे कोर्टात ११:३० वा. झाली. या सुनावणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील कोर्टात उपस्थित होते. मात्र ही सुनावणी काही मिनिटांतच संपली. या सुनावणीनंतर राजन विचारे आणि केदार दिघेंकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे.
हेही वाचा : लक्ष दीप हे उजळले जगी...
नेमकं प्रकरण काय ?
२००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकरत्यांनी परप्रांतीय रेल्वे भरतीवरून आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी कल्यान स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहान आणि स्थेशनचे नुकसान केल्याचा आरोप मनसे पक्षावर आहे. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा मनसेने आरोप केला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका असून, या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती.