World Human Rights Day : जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त द. एन. एस. अंध उद्योग गृहातील मुलांना अन्न वाटप

10 Dec 2025 20:33:15
World Human Rights Day
 
मुंबई : (World Human Rights Day) जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त वरळीत मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, (नवी दिल्ली) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश गावडे यांच्याकडून द. एन. एस. अंध उद्योग गृहातील सर्व मुलांसाठी अन्न वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअतंर्गत अंध उद्योग गृहातील सर्व मुलांना दुपारच्या दरम्यान अन्न वाटप करण्यात आले.
 
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश रमाशंकर गुप्ता आणि राष्ट्रीय वरिष्ठ सल्लागार विश्वनाथ डांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यासोबतच स्वर राज प्रतिष्ठान च्या संस्थापिका अध्यक्षा माहेश्वरी मोरे, व सल्लागार शितल गावडे यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग दर्शवला होता. (World Human Rights Day)
 
हेही वाचा :  Mangalprabhat Lodha : विधानसभेत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आ. अस्लम शेख यांच्यात जोरदार खडाजंगी
 
"जनतेपर्यंत त्यांचे हक्क पोहोचवण्यासाठी मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट काम करत आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह देशभरातील नऊ राज्यांमध्ये हा ट्रस्ट कार्यरत असून, गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे."
- दिनेश रमाशंकर गुप्ता, मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष
 
"बऱ्याच लोकांना मानवी हक्क काय आहेत याबद्दल माहिती नसते, अशा लोकांना त्याच्या हक्कांची माहिती करून देण्यासाठी हा ट्रस्ट काम करत आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेने फक्त त्यांचे प्रश्न आणि समस्या आमच्यासमोर मांडाव्या. आमची लीगल टीम त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल."
- विश्वनाथ डांबरे, मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे राष्ट्रीय वरिष्ठ सल्लागार
 
"या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेची जेवढी सेवा करू शकतो ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. लोकांनी त्यांच्या समस्या आमच्याकडे मांडाव्या, त्या सोडवण्यासाठी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करू. या कामासाठी आमच्याकडे वकीलांची संपूर्ण लीगल टीम व सल्लागार आहेत. त्यामुळे जनतेला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू."
- उमेश गावडे, मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
 
 
Powered By Sangraha 9.0