Mangalprabhat Lodha : विधानसभेत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आ. अस्लम शेख यांच्यात जोरदार खडाजंगी

    10-Dec-2025   
Total Views |
Mangalprabhat Lodha
 
नागपूर : (Mangalprabhat Lodha) मालाड-मालवणी परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्यावरून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) आणि आ. अस्लम शेख यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.(Mangalprabhat Lodha)
 
“मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मुंबई पब्लिक स्कूलच्या 'मालवणी टाऊनशप शाळे'त स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षक भरती केली गेली. मात्र, हे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण नाहीत. अपात्र शिक्षकांची भरती करुन मालवणी टाऊनशिप शाळेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा चालू आहे,” असा प्रश्न आ. अस्लम शेख यांनी उपस्थित केला. यावरुन अस्लम शेख आणि मंत्री मंगलप्रभात लोढा आमनेसामने आले.(Mangalprabhat Lodha)
 
हेही वाचा : Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजनेचा मुद्दा विधानसभेत गाजला
 
स्थानिक आमदारांचा विरोध कशासाठी? - मंत्री लोढा
 
“मुंबई महानगरपालिकेने २००७ पासून शाळा खासगी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण राबवले असून, त्याअंतर्गत आज ३७ शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. या संस्थांना फक्त शिक्षकांचे पगार आणि शाळा चालवण्याचा खर्च देण्याचीच जबाबदारी असून त्यांना कोणताही मालकी हक्क नाही. या धोरणांतर्गत मालवणी टाऊनशिप स्कूल पूर्वी फझलानी ट्रस्ट यांच्यासह भागीदारीत होती, तेव्हा स्थानिक आमदारांना कोणताही आक्षेप नव्हता. ट्रस्टने शाळेची जबाबदारी नाकारली म्हणून आता प्रयास फाउंडेशन पुढे आले असून पालकांचीही तीच मागणी आहे. सहपालकमंत्री म्हणून पालकांच्या बाजूने उभे राहण्यात गैर काय? विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल तर त्याला स्थानिक आमदारांचा विरोध कशासाठी? महापालिका शाळांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण राबवताना सर्वांना समान न्याय केला जाईल,” असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.(Mangalprabhat Lodha)
 
“मी पालकमंत्री या नात्याने तिथे गेलो असताना मला धमकी देण्यात आली. २०१० मध्ये मालवणीमध्ये एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्के होती. आता २०२४ मध्ये ती संख्या ३६ टक्क्यांपर्यंत आली आहे. त्यांनी १०० एकर सरकारी जमिनींवर कब्जा केला असून ते लोक कुठून आले?” असा प्रश्न मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित केला.(Mangalprabhat Lodha)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....