Government of Maharashtra: २०२६ मध्ये २४ सरकारी सुट्ट्या, महाराष्ट्र सरकारकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर!

10 Dec 2025 17:44:07
Government of Maharashtra
 
मुंबई : (Government of Maharashtra) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी महाराष्ट्र सरकारने नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वर्षभरात २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Government of Maharashtra)
 
हेही वाचा :  Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी; सभागृहात गदारोळ
 
महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू आहे. याशिवाय १ एप्रिल २०२६ हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. (Government of Maharashtra)
 
महाराष्ट्र (Government of Maharashtra) शासनाच्या २०२६ सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी शासन निर्णय (GR) आणि विविध विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. ज्यात प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), दिवाळी, भाऊबीज (११ नोव्हेंबर) गुरूनानक जयंती, आणि नाताळ (२५ डिसेंबर) यांसारख्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे. (Government of Maharashtra)
 
 
Powered By Sangraha 9.0