Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी; सभागृहात गदारोळ

    10-Dec-2025   
Total Views |
Tukaram Mundhe
 
नागपूर : (Tukaram Mundhe) महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत आ. कृष्णा खोपडे आणि आ. प्रवीण दटके यांनी विशेष लक्षवेधी सूचना मांडली आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली. यावरून विधानसभा सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.(Tukaram Mundhe)
 
"२०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर मनपा आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी शासनाची अधिकृत नियुक्ती नसतानाही नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा प्रभार नियमबाह्यपणे स्वतःकडे घेतला. त्यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना नियमबाह्य पद्धतीने तब्बल २० कोटी रुपये दिले," असा आरोप आमदार कृष्ण खोपडे आणि प्रवीण दटके यांनी केला.(Tukaram Mundhe)
 
हेही वाचा : Aditi Tatkare : महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न
 
महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन
 
"त्यावेळी त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मुंढे (Tukaram Mundhe) यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यांच्याविरोधात त्या महिला अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. परंतू, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. काल माझ्या दोन्ही मोबाईलवर तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बोलू नका अशी धमकी आली असून याप्रकरणी त्वरित कारवाई करावी. तसेच तुकाराम मुंढे यांचे निलंबन करावे," अशी मागणी आ. कृष्ण खोपडे यांनी केली.(Tukaram Mundhe)
 
सभागृहाचे कामकाज तहकूब
 
या मुद्द्यावर सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहात गदारोळ घातला. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. "या सभागृहात एखादा प्रश्न मांडू नये म्हणून धमकी येणे हा त्यांच्या विशेषाधिकराचा भंग आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घेऊन लवकरात लवकर सभागृहात निवेदन केले जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.(Tukaram Mundhe)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....