दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात काश्मिरी डॉक्टर बिलाल नसीर मल्ला अटकेत

10 Dec 2025 17:08:26
Delhi Bomb Case
 
मुंबई : ( Delhi Bomb Case ) दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने काश्मीरमधील बारामुल्ला येथील रहिवासी डॉ. बिलाल नसीर मल्ला या डॉक्टरला अटक केली आहे. त्याच्यावर आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबी मोहम्मद याला आश्रय देण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या आठ झाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दहशतवादी उमर नबी मोहम्मद याला डॉ. बिलालने लपून बसण्यास आणि पुरावे नष्ट करण्यात मदत केली. याप्रकरणी डॉ. बिलालला दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे न्यायाधीशांनी त्याला सात दिवसांसाठी एनआयए कोठडी सुनावली. यादरम्यान पूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी अमीर रशीद अली याची कोठडीही सात दिवसांनी वाढवण्यात आली.
 
हेही वाचा : तिरुपती देवस्थानमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस
 
आतापर्यंत ८ जणांना अटक
 
या प्रकरणात डॉ. मुझमिल गनई, डॉ. आदिल राठर, डॉ. शाहिना सईद, मौलवी इरफान, अमीर रशीद अली, जसीर बिलाल वाणी आणि आता डॉ. बिलाल नसीर मल्ला यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने सांगितले आहे की तपास सुरू आहे आणि कटातील प्रत्येक घटना उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Powered By Sangraha 9.0