तिरुपती देवस्थानमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस

Total Views |

Tirupati
 
मुंबई : ( Tirupati ) तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भाविक आणि देणगीदारांना रेशमी दुपट्ट्यांऐवजी पॉलिस्टरचे पट्टू दुपट्टे देण्यात येत होते. पट्टू दुपट्ट्यांच्या तुलनेत रेशमी दुपट्ट्यांची किंमत जास्त आहे. त्यामुळेच यात प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये परस्पर लंपास करण्यात आले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, देवस्थानचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या आदेशावरून चौकशी सुरू झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. जेव्हा तपास पथकाने तिरुपतीच्या गोदामातून आणि तिरुमलाच्या मंदिरांमधून दुपट्ट्यांचे नमुने घेतले आणि ते बेंगळुरू आणि धर्मावरम येथील सेंट्रल सिल्क बोर्डाच्या प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी पाठवले तेव्हा दोन्ही ठिकाणी केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, हे दुपट्टे १००% शुद्ध रेशमापासून बनवल्याचे दाखवले जात असले तरी ते पूर्णपणे पॉलिस्टरचे बनलेले होते. याशिवाय दुपट्ट्यांमधून रेशीम होलोग्राम देखील आढळून आला नाही.
 
हेही वाचा : Delhi Blast Case: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी NIA कडून आणखी एका डॉक्टरला अटक, उमर नबीला रसद पुरवल्याचा आरोप
 
५५ कोटींचा खेळ...
 
हा घोटाळा व्हीआरएस एक्सपोर्ट्स नावाच्या कंपनीने केला आहे. २०१५ ते २०२५ दरम्यान या कंपनीने तिरूमला तिरूपती देवस्थानला अंदाजे ५४.९५ कोटी किमतीचे कापड पुरवले. तसेच राज्या प्रशासनाने या कंपनीला प्रति नग १,३८९ या दराने १५,००० दुपट्टे पुरवण्याचे नवीन कंत्राट देखील दिले होते. देवस्थानने याला भक्तांच्या विश्वासाची पायमल्ली म्हटले आहे. हे प्रकरण आता सखोल चौकशीसाठी आणि कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.