मुंबई : (Delhi Blast Case) दिल्ली स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आणखी एका संशयिताला अटक केली आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील डॉ. बिलाल नसीर मल्ला याला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील ही आठवी अटक आहे. मल्लाने आत्मघातकी स्फोट (Delhi Blast Case) घडवणारा उमर नबी याला मदत केल्याचा आणि स्फोटानंतर पुरावे नष्ट केल्याचा आरोप एनआयएकडून करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून आणखी अटकांची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Delhi Blast Case)
यासंदर्भात एनआयएकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. एनआयएला असे आढळून आले की, लाल किल्ला परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील (Delhi Blast Case) कटात डॉ. बिलालचा सहभाग होता, ज्यामध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. एनआयएच्या निष्कर्षांनुसार, बिलालने उमर नबीला रसद पुरवली होती आणि त्याला आश्रय दिला होता. त्याच्यावर आत्मघाती बॉम्बस्फोटाशी संबंधित पुरावे नष्ट केल्याचाही आरोप -आहे. एनआयए या प्राणघातक दहशतवादी कृत्यामागील कटाचा तपास सुरू ठेवत आहे. कटाचे सर्व धागेदोरे उलगडण्यासाठी दहशतवादविरोधी संस्था विविध केंद्रीय आणि राज्य संस्थांसोबत मिळून काम करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. (Delhi Blast Case)
दिल्लीतील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांच्या नियुक्त न्यायालयात हजर झाल्यानंतर, बिलालला सात दिवसांसाठी एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान बिलालसोबत हजर करण्यात आलेल्या या प्रकरणातील आरोपी अमीर रशीद अली याच्या एनआयए कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली. (Delhi Blast Case)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\