Pravin Darekar : नवी मुंबईतही विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास यशस्वी होऊ शकतो: स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

08 Nov 2025 18:06:24
Pravin Darekar
 
नवी मुंबई : (Pravin Darekar) मुंबईपेक्षा स्वयं पुनर्विकासाची जास्त गरज नवी मुंबईला आहे. नवी मुंबईत वसलेला रहिवाशी कष्टकरी, गिरणी कामगार, माथाडी कामगार आहे. इथे उंच टॉवरमध्ये राहणारा रहिवाशी नाही. ९०-९५ टक्के लोकं मध्यमवर्गीय आहेत. नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. परंतु निर्धार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले आहे.
 
आज नवी मुंबईतील सेक्टर ३ येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात नवी मुंबई को-ऑप.हौसिंग फेडरेशनतर्फे पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. प्रविण दरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबई को-ऑप.हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल चौधरी, सचिव भास्कर म्हात्रे, सतिश निकम, प्रसाद परब, प्रमोद जोशी यांसह मोठ्या संख्येने गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, नवीमुंबईकर नागरिक उपस्थित होते.
 
हेही वाचा :  BARTI : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचा शतकोत्तरी रोप्यमहोत्सव बार्टीतर्फे साजरा
 
यावेळी मार्गदर्शन करताना आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले कि, हा कार्यक्रम नवी मुंबईसाठी महत्वाचा आहे. आपला उत्साह पाहिल्यावर स्वयं पुनर्विकास ही नवी मुंबईकरांची गरज असल्याचे दिसून येतेय. स्वयं पुनर्विकास आज होत नाही. मी फक्त त्याला आकार देण्याचे काम केलेय. विकासकाच्या हातात गेलेला भाग सभासदांच्या हातात आणण्यासाठी शासकीय योजना उभी केली. स्वयं पुनर्विकासाला रचनात्मकसाच्यात बसविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मी करत असल्याचेही दरेकर म्हणाले.
 
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले कि, मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबईत ही योजना सुरु केली, कर्ज धोरणही आणले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या काळात स्वतः लक्ष घालून शासन दरबारी परवानग्या देण्याचे काम केले. जिथे जिथे अडचणी आल्या तिथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केले. अशा प्रकारे २-३ प्रकल्प यशस्वी झाले. परंतु कायदा, शासन निर्णय होणे गरजेचे होते. यासाठी गोरेगाव येथे हौसिंगची परिषद घेतली. त्या परिषदेत तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १८ मागण्या केल्या. त्यापैकी १६ मागण्या मान्य करत त्याचे शासन निर्णयही जारी केले व या स्वयं पुनर्विकासाला खरी गती मिळाली. त्यामुळे ही योजना स्थिरावल्याचेही दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.
 
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याला मंत्रीपदाचा दर्जाही दिला आहे. नुकतीच म्हाडा कार्यालयात सिडकोचे प्रश्न सोडविण्याबाबत बैठक पार पडली. नवी मुंबईत स्वयं पुनर्विकास योजना राबविण्यासाठी ९०-९५ टक्के सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली आहे. या बैठकीचे मिनिट्स सरकारला जाणार असून नवी मुंबईकरांसाठी चांगला सकारात्मक निर्णय होणार आहे. चांगले काम हातात घेतले तर टप्प्याटप्प्याने यश मिळते. आपणच आपला विकास करून मोठी जागा मिळवायची. यासाठी अनेक सोसायट्यांनी पुढे आले पाहिजे. जी मदत, सहकार्य लागेल ती निश्चितपणे प्राधिकरणाच्या माध्यमातून करू, असा विश्वासही दरेकरांनी (Pravin Darekar) यावेळी दिला.
 
हे वाचलात का ? :  Sharad Pawar : पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, या प्रकरणात चौकशी...
 
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने नवी मुंबई को-ऑप हौसिंग फेडरेशनच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.
 
शरद पवारांनाही स्वयं पुनर्विकासाचे कुतूहल
 
दरेकर (Pravin Darekar) म्हणाले कि, स्वयं पुनर्विकास हे महाराष्ट्रात क्रांतिकारी पाऊल आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी गेलो असता तिथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जवळ बोलावून स्वयं पुनर्विकास, त्याची प्रक्रिया आणि लोकांना होणाऱ्या फायद्याबाबत विचारणा केली. त्यांना मी सर्व समजावून सांगितले. त्यांनी पुस्तिका पाठवण्याचे सांगितले असता मी स्वतःच पुस्तिका घेऊन येईन असे म्हटले. एवढे कुतूहल स्वयं पुनर्विकासविषयी लोकांना आहे. विकासकाशिवाय सोसायटी उभी राहते व सर्वसामान्यांना मोठे घर मिळते हा हौसिंग सेक्टरमधील चमत्कार असल्याचेही दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0