BARTI : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचा शतकोत्तरी रोप्यमहोत्सव बार्टीतर्फे साजरा

    08-Nov-2025
Total Views |
BARTI
 
मुंबई : (BARTI) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाच्या निमित्ताने बार्टीतर्फे राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शतकोत्तरी रोप्यमहोत्सव सातारा, बार्टी (BARTI) मुख्यालय पुणे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये उत्साहात साजरा झाला.
 
BARTI  
 
बार्टी (BARTI) मुख्यालय, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणप्रवेशाच्या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगलीच्या अध्यक्षा श्रीमती नरके, बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, विभागप्रमुख अनिल कारंडे, मारुती बोरकर, वृषाली शिंदे, नितीन चव्हाण तसेच बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी मानले.
 
हेही वाचा :  Sharad Pawar : पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, या प्रकरणात चौकशी...
 
सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या छत्रपती प्रतापसिंह भोसले शाळेत शिकले त्या ठिकाणी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, तसेच बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात “कविता बाबासाहेबांच्या” या निमंत्रितांच्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शालेय विद्यार्थ्यांची समता रॅली, बार्टीच्या सवलतीच्या दरातील पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.
 
हे वाचलात का ? :  Rupali Thombre Patil : रुपाली ठोंबरेंना मोठा धक्का! पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस, ७ दिवसांच्या आत...
राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये बार्टीच्या समतादूतांच्या माध्यमातून शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, समता आणि जागरूकतेचा संदेश देणारे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले.