Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणाले, "तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर..."

05 Nov 2025 15:24:40
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असतान, विरोधकांकडून सतत्याने निवडणूक आयोगावर आरोप करण्यात येत आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे, तसेच दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, निवडणूक याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यावरच निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असल्याचे म्हटले आहे. ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : राज्यातील विकासकामांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये...
 
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "राज ठाकरेंना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे, निवडणुका पुढे ढकला. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका घेतल्या जात आहेत, त्या पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही." तसेच उद्धव ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काहीच येत नाही, असेही ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0