Narendra Modi : मोदींची मन की बात तर काँग्रेसअंतर्गत नेतृत्व नाराजीवर जाहीर बात

30 Nov 2025 18:21:48
Narendra Modi
 
मुंबई : (Narendra Modi) रविवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देश विदेशातील श्रोत्यांशी संवाद साधला. आत्तापर्यंतचा हा १२८वा भाग होता.
 
३ ऑक्टोबर २०१४ पासून तब्बल अकरा वर्षे हा जनसंवाद सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या निवडणूकीतील सातत्याने होणाऱ्या पराभवाने काँग्रेसीजन आता या अपयशावर काँग्रेसअंतर्गत नेतृत्वावर विशेषता राहुल गांधींवर नाराजीची जाहीर बात करीत आहेत.
 
हेही वाचा :  अस्थिरतेतून स्थिरतेकडे प्रवास म्हणजे भगवद गीता : धनंजय गोखले
 
मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधत असतात. नागरिकांच्या वेगवेगळ्या कल्पनांना आपल्या सरकार द्वारे राबवण्याचा प्रयत्न करत असतात. याउलट मात्र जनतेशी थेट संवाद तर सोडाच पण आपल्या कार्यकर्त्यांशी आणि पक्षांतर्गत सहकाऱ्यांचे सुद्धा कोणतेही मत काँग्रेस नेतृत्व विचारात घेताना दिसत नाही आहे. याचाच विस्फोट सर्वत्र पाहायला मिळत आहे.कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील खुर्ची नाट्य सोडवताना दिल्ली स्थित काँग्रेस नेतृत्वाची दमछाक झाली होती.
 
आता दुसरीकडे सोनिया गांधी यांचे निकरवरती कै. अहमद पटेल यांचे सुपुत्र फैसल पटेल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवास राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना जबाबदार ठरवल आहे. "पक्षाची कमान आता शशी थरूर किंवा अन्य योग्य नेत्याकडे द्यावी जे गांधी परिवारतील वंशजापेक्षा २५ पट अधिक सक्षम आहेत." अशी टीका फैसल पटेल यांनी केली होती. स्वतःच्या वेगळ्या पक्ष घोषणेच्या तयारीत ते असल्याचे समजते.महाराष्ट्राततर याहून वाईट परिस्थिती असून सध्याच्या नगरपालिका आणि होणाऱ्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्व दिशाहीन झालेले पाहायला मिळत आहेत. कधी 'एकला चलो रे' तर कधी महाविकास आघाडी हा पेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वासमोर ऐन निवडणुकीत अजून कायम आहे. यामुळे सहयोगी उबाठा आणि शरद पवार गट यांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे.ज्याचा सरळ फायदा महायुतीला होणार आहे. (Narendra Modi)
 
हे वाचलात का ?:  वंदे मातरम म्हणालो तर 'मुर्दा कौम' समजतील; मौलाना महमूद मदनी यांचे वादग्रस्त विधान
 
बिहार निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात देखील अंतर वाढत चाललेले आहे. याचा परिणाम पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मधील सहयोगी पक्षांच्या भूमिकेवर सुद्धा होतानाची चर्चा जोरावर आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये मागील वेळी तृणमूल काँग्रेसने काँग्रेस पक्षाला थोडा सुद्धा भाव दिला नव्हता. आता देखील काँग्रेसचे सर्व सहयोगी पक्ष महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची दखल धरताना दिसेना झालेले आहेत. भाजपा नेतृत्व सर्वत्र थेट जनतेशी संवाद साधणे ,त्यांची विकासकामे मार्गी लावणे हे करत असताना काँग्रेससमोर मात्र नेतृत्वात बदल बाबत चर्चांना लगाम घालणे अन् आपल्या सहयोगी पक्षांना एकत्र बांधून ठेवणे हेच मोठे आव्हान समोर आहे. (Narendra Modi)
 
 
Powered By Sangraha 9.0