मुंबई :( Vande Mataram ) जर एखादी कौम ‘वंदे मातरम’ म्हणू लागली तर तिला ‘मुर्दा कौम’ संबोधले जाईल. कारण मुर्दा कौम शरण जाते. एखादी कौम जिवंत असेल तर त्यांनी परिस्थितीचा सामना केला पाहिजे, असे विधान जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष महमूद मदनी यांनी केले. भोपाळमध्ये जमीयत उलेमा-ए-हिंद च्या नेशनल गवर्निंग बॉडी मीटिंगमध्ये ते बोलत होते.
मदनी यांनी सर्वोच्च न्यायालयावर देखील तीव्र टीका केली. ते म्हणाले की, बाबरी मशीद आणि तीन तलाकच्या निकालानंतर असे दिसते की, न्यायालये सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. ज्ञानवापी आणि मथुरा प्रकरणही सुनावणीसाठी योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय सुप्रीम तेव्हाच आहे जेव्हा ते संविधानाची रक्षा करते, अन्यथा त्याला सुप्रीम म्हणण्याची काही गरज नाही. मदनी यांनी ‘जिहाद’ला पवित्र कर्तव्य मानले आणि म्हटले की, जोपर्यंत अन्याय असेल, तोपर्यंत जिहाद सुरू राहील.
वंदे मातरम कोणत्याही धर्माचे प्रतीक नाही
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी मदनी यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. पात्रा यांनी मदनी यांच्या वक्तव्याला बेजबाबदार म्हणत, वंदे मातरम हे कोणत्याही धर्माचे प्रतीक नाही, तर तो भारतमातेचा सुगंध आहे असे सांगितले. ते म्हणाले की, मदनीने वंदे मातरम् विरोधात निदर्शने भडकावून फुटीरता दाखवली आहे. दहशत पसरवून समाज भडकावणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
-संबित पात्रा, भाजप प्रवक्ते
या मानसिकतेच्या लोकांसाठी भारत ही नापाक भूमी
आम्ही वंदे मातरम बोलणार नाही अशी विधाने करणाऱ्यांनी आधी त्यांचा मूळ देश शोधावा आणि त्या देशात जावे. कारण वंदे मातरम हा भारतमातेचा गौरव आहे. जर त्यांना वंदे मातरमचा एवढा तिरस्कार असेल तर देशातील नद्यांची नावे गंगा, यमुना, भागिरथी आहेत त्या नद्यांचे पाणी तरी का पितात. त्याने तुमच्या धर्माला कलंक लागत नाही का? तुमच्या पत्त्यावर ज्यावेळी इथली हिंदू नावे लिहता, त्यावेळी तुमच्या धर्माला कलंक लागत नाही का? खरंतर भारत हि या लोकांसाठी नापाक भूमी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वातंत्र्यावेळी वेगळा देश दिला आहे जो पाक आहे. त्यामुळे या मानसिकतेच्या लोकांनी तिथे जावे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.