Nitesh Rane : राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणनेला सुरुवात

Total Views |
Nitesh Rane
 
मुंबई : (Nitesh Rane) भारतातील सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला सोमवार,दि.३ रोजी औपचारिक सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती दि. ३ नोव्हेंबर ते दि. १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था (सीएमएफआरआय)आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.
 
हेही वाचा :  तुंगारेश्वरमध्ये भारतातील सगळ्यात छोट्या हरिणाचे दुर्मीळ दर्शन
 
जनगणनेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये
 
या मोहिमेचा उद्देश केवळ आकडेवारी गोळा करणे नसून देशातील सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबांची माहिती, ५६८ मासेमारी गावे आणि १७३ मत्स्य उतरण केंद्रे यांचा तपशीलवार अभ्यास करून सागरी क्षेत्रातील धोरणनिर्मिती व नियोजनाला दिशा देणे आहे. या अंतर्गत मच्छीमारांची सामाजिक-आर्थिक स्थिती, पायाभूत सुविधा, उपजीविका साधने आणि शासकीय योजनांच्या लाभांबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. (Nitesh Rane)
 
जनगणनेचे डिजिटायझेशन 'व्यास एनव्ही' प्रणालीद्वारे नवे युग
 
प्रथम ही जनगणना पूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर राबवली जात आहे. सीएमएफआरआयने विकसित केलेल्या ‘व्यासएनव्ही’ अॅप प्रणालीद्वारे गणकांना टॅबलेट पीसी वितरित करण्यात आले आहेत. या अत्याधुनिक प्रणालीमुळे डेटा संकलनात अचूकता, पारदर्शकता आणि वेग येणार असून शासनाला धोरणनिर्मितीसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.