तुंगारेश्वरमध्ये भारतातील सगळ्यात छोट्या हरिणाचे दुर्मीळ दर्शन

    03-Nov-2025
Total Views |
mouse deer spotted in tungareshwar
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतामधील हरिणाची सगळ्यात लहान प्रजात असणाऱ्या पिसूरी हरिणाचे दर्शन तुंगारेश्वर अभयारण्यात झाले आहे (mouse deer spotted in tungareshwar). शुक्रवार दि. ३१ आॅक्टोबर रोजी वनकर्मचाऱ्यांसोबत अधिवास पाहणीसाठी गेलेल्या 'पाॅलिसी अॅडव्होकेसी रिसर्च सेंटर'च्या (पार्क) संशोधकांना या दुर्मीळ हरिण प्रजातीचे दर्शन झाले (mouse deer spotted in tungareshwar). ही प्रजात निशाचर आणि फार बुजऱ्या स्वभावाची असल्याने तिचे दर्शन दुर्मीळ असते (mouse deer spotted in tungareshwar).
 
 
'पार्क'च्या 'वाईल्डलाईफ रिसर्च डिव्हिजन'चे संशोधक रोविन तोडणकर हे शुक्रवारी तुंगारेश्वर अभयारण्यात अधिवास पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्याच्यासोबत वनपाल उदय साळवी आणि वनरक्षक विशाल पाटील होते. तसेच कृषी तज्ज्ञ योगेश केकाणे देखील त्यावेळी सोबत होते. त्यावेळी जंगलातील एका पायवाटेवर या मंडळींना एक प्राणी बसलेला आढळून आला. जवळ गेल्यानंतर तोडणकर यांना तो प्राणी पिसूरी हरिण असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच त्याचे छायाचित्र टिपले. भक्षक मागे लागल्याने पिसूरी हरिण त्याठिकाणी निपचिप बसून असल्याचा कयास तोडणकर यांनी लावला. वनकर्मचाऱ्यांनी देखील हा प्राणी यापूर्वी कधी अभयारण्यात पाहिला नव्हता.
 
 
भारतात सापडणाऱ्या हरणाच्या १२ प्रजातींमधील आकाराने सर्वात लहान असणाऱ्या हरणाची प्रजात म्हणजे माऊस डिअर. (ग्राफिक) पिसूरी हरणाच डोकं हे लहान आणि नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला माऊस डिअर असं म्हटलं जात. जगात माऊस डिअरच्या १० प्रजाती आढळतात त्यापैकी 'इंडियन स्पोटेड शेवरोटेन' ही भारतात आढळणारी एकमेव माऊस डिअरची प्रजात. कोकणात यांना पिसेरा, पिसोरा पिसूरी किंवा गेळा असं म्हणतात. निशाचर, आकाराने लहान आणि बुजऱ्या स्वभावाचा असल्याने हा समखुरी प्राणी सहज दिसून येत नाही. घनदाट जंगलातील मोठाल्या वृक्षांच्या बुंध्याशी असणाऱ्या खड्यांमध्ये पिसूरी हरिण निवारा करतात. बहुतेक खडकाच्या कपारीत किंवा दगडांखाली लपून बसणे हा जीव पसंत करतो. शिवाय आयत्या बीळांमध्ये देखील तो राहतो.