Love Jihad : ऑक्टोबर महिन्यात लव्ह जिहादच्या तब्बल १९ प्रकरणांची नोंद

03 Nov 2025 16:56:40
Love Jihad
 
मुंबई : (Love Jihad) भारतात ‘लव्ह जिहाद’ या संघटित आणि चिंताजनक प्रवृत्तीचा विस्तार सातत्याने होताना दिसतो आहे. प्रेम आणि विश्वासाच्या आडून एका ठराविक विचारसरणीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देशभर दिसून येतायत. ही केवळ काही वैयक्तिक प्रकरणांची शृंखला नसून, समाजाच्या सांस्कृतिक सुरक्षेला, स्त्रीसन्मानाला आणि ओळखीला लागलेला खोल घाव आहे. ऑक्टोबर महिन्यात देशभरात लव्ह जिहादचे (Love Jihad) तब्बल १९ प्रकरणे उघडकीस आली आहे. प्रत्येक घटना ही केवळ आकडेवारी नव्हे; ती एका उद्ध्वस्त जीवनाची, विस्कटलेल्या कुटुंबाची आणि विस्मृतीत गेलेल्या ओळखीची कहाणी आहे.
 
मुंबईच्या कोलाबा परिसरात आठ वर्षांच्या मुलीवर डिलिव्हरी बॉयकडून अत्याचार झाल्याची घटना २९ ऑक्टोबर दरम्यान समोर आली होती. आरोपीचे नाव इमरान मोहम्मद शेरखान असे असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली व त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : नागपूरमध्ये ५ हजार कोटींच्या विकास कामांना गती  
 
बोरिवली येथे २७ ऑक्टोबर रोजी लिव्ह-इन रिलेशनशिपमधून उघड झालेला लव्ह जिहादचा (Love Jihad) नवा प्रकार घडला होता. २१ वर्षांच्या हिंदू युवतीने मुस्लिम युवक शाहिद शेख याच्यासोबत लग्न न करता “लिव्ह-इन रिलेशनशिप करार” केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. युवतीने हा करार आपल्या आईच्या मोबाईलवर पाठवल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने हिंदुत्ववादी संघटनांकडे धाव घेतली आणि मदत मागितली होती.
 
उत्तराखंडमध्ये २६ ऑक्टोबर रोजी ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) धक्कादायक प्रकार निदर्शनास आला होता. केरळ स्टोरीप्रमाणे एका मुस्लिम जिहादीने हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्नाचे खोटे आमिष दाखवले होते. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात २६ ऑक्टोबर रोजी एका जिहादीने हिंदू युवतीला फसवून तिला हिजाब घालयाला लावला. फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये हिंदू तरुणीला फसवून जबरदस्ती धर्मांतर आणि देहविक्रीस प्रवृत्त केल्याचे प्रकरण २४ ऑक्टोबर रोजी समोर आले.
 
बंगळुरूमध्ये २३ ऑक्टोबर दरम्यान हिंदू युवतीला फसवून जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. सदर प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद इशाक बिन अब्दुल रसूल या युवकाविरुद्ध बलात्कार, फसवणूक, धमक्या आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात हिंदू समाजातील एका तरुणीचे मुस्लिम युवकाने अपहरण करून धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार २३ ऑक्टोबर दरम्यान उघडकीस आला होता.
 
हे वाचलात का ? : EVM : ईव्हीएमच्या आडून नरेटिव्ह सेट करण्याची धडपड
 
आग्रा जिल्ह्यात एका विवाहीत महिलेला जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती २२ ऑक्टोबर रोजी निदर्शनास आली. त्याचबरोबर बलिया जिल्ह्यात देखील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची व तिला धर्मपरिवर्तन करण्यासाठी बळजबरी केल्याची धक्कादायक घटना याच दिवशी उघडकीस आली होती.
 
१७ ऑक्टोबर रोजी मैनपुरी (उत्तर प्रदेश) ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरण, १६ ऑक्टोबर रोजी लखनौ मधील गुडंबा परिसरात घडलेले लव्ह जिहादचे प्रकरण, १४ ऑक्टोबर रोजी झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात घडलेले प्रकरण ज्यामध्ये एका अल्पवयीन हिंदू युवतीचे बनावट आधार कार्ड तयार करून तिला मुस्लिम दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. १० ऑक्टोबर रोजी समाज माध्यमांवर ओळख करून मुस्लिम युवकाने हिंदू स्त्रीवर बलात्कार करून धर्मांतरणाचा दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे घडला होता.
 
मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरण ऑक्टोबर ९ रोजी उघडकीस आले होते. आयान खान या मुस्लिम युवकाने स्वतःचं नाव ‘राज’ असं सांगून एका हिंदू मुलीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले. मुलीचा विश्वास संपादन करून त्याने तिला विवाहाचे खोटे आश्वासन दिले. मात्र सत्य समोर आल्यावर आरोपीने तिचे अपहरण केले आणि जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला होता.
 
उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यात ६ ऑक्टोबर रोजी एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू मैत्रिणीला बुरखा घालून पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावातून निघत असताना स्थानिक लोकांनी आणि मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना पाहिले. सदर युवकाला तिथेच अडवून स्थानिकांनी आणि मुलीच्या नातेवाइकांनी युवकास चोप दिला होता. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी घडलेले ‘लव्ह जिहाद’चे (Love Jihad) धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. अमीर नावाच्या युवकाने स्वतःला अनिल असे सांगून एका विवाहित हिंदू महिलेशी ओळख वाढवली. त्याने खोट्या नावाने तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि शारीरिक संबंध ठेवले. काही काळानंतर जेव्हा महिलेला त्याची खरी ओळख समजली तेव्हा अमीरने तिला इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला आणि धमकावले.
 
हेही वाचा :  प्रशासनातील स्वच्छतादूत
 
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी घडलेले ‘लव्ह जिहाद’चे (Love Jihad) प्रकरण असे की, अमीर नावाच्या मुस्लिम युवकाने स्वतःला आदित्य वर्मा असे सांगून एका हिंदू महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दीर्घकाळ तिची फसवणूक करून त्याने शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा तिला त्याची खरी ओळख कळली आणि तिने विरोध केला. तेव्हा आरोपी अमीरने आपल्या काही साथीदारांसह तिच्यावर जबरदस्ती व अत्याचार केला होता. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील बडनगर परिसरात ‘लव्ह जिहाद’शी (Love Jihad) संबंधित एक धक्कादायक प्रकरण १ ऑक्टोबर रोजी समोर आले होते. येथील एका हिंदू युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या कुटुंबीयांनी मुस्लिम युवकावर फसवणूक, जबरदस्ती धर्मांतर आणि अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार आरोपी युवकाने सुरुवातीला स्वतःला युवतीचा ‘भाऊसमान मित्र’ म्हणून दाखवले. घरातील विश्वास संपादन केला. नंतर त्याने तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला. पीडितेला नमाज वाचण्यास, बुर्का घालण्यास आणि इस्लामी रितीनुसार वागण्यास भाग पाडले गेले. जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला.
 
राजस्थानातील टोंक जिल्ह्यात एमआयएम पक्षाचे माजी प्रदेश सचिव काशिफ जुबेरी यांच्यावर ‘लव्ह जिहाद’,बलात्कार आणि जबरदस्ती धर्मांतराचा गंभीर आरोप करण्यात आला होता. सदर प्रकरण दि. १ ऑक्टोबर रोजी निदर्शनास आले. काशिफ जुबेरी यांनी स्वतःला अविवाहित असल्याचे सांगत तिच्याशी ओळख वाढवली. जयपूरमधील एका फ्लॅटमध्ये तिला अमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी विवाहाचे खोटे आश्वासन देत इस्लाम धर्म स्वीकारण्यास दबाव आणला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0