Ramdas Athawale : कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

29 Nov 2025 14:49:29
Ramdas Athawale
 
मुंबई : (Ramdas Athawale) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय संसदीय लोकशाहीचा प्राण संविधानात आहे. संविधानामुळेच देशाची एकता अखंडता मजबूत आहे. त्यामुळे कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. नवी दिल्लीतील मावळणकर सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली प्रदेश तर्फे संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात आला.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
हेही वाचा :  Local Body Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबरला रात्री १० पर्यंत प्रचार करता येणार
 
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापना झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा देशातील जुना प्रमुख राजकीय पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाचे १९६० च्या दशकात ९ खासदार निवडून आलेले होते. पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद होती. उत्तर देश हरियाणा पंजाब मध्ये तत्कालीन सरकार मध्ये रिपाइं चे मंत्री झालेले होते. दिल्लीचा महापौर रिपब्लिकन पक्षाचा होता हा इतिहास आहे. तत्कालीन रिपब्लिकन नेते बी पी मौर्य हे काँग्रेस पक्षात गेल्यानंतर उत्तर भारतात रिपब्लिकन पक्षाला उतरती कळा लागली. रिपब्लिकन पक्षाचा वैभवशाली गौरवशाली इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे.हत्ती हे निवडणूक चिन्ह मूळ रिपब्लिकन पक्षाचे होते.संपूर्ण उत्तर भारतात रिपब्लिकन पक्षाची ताकद उभी करून रिपब्लिकन पक्षाचे सोनेरी दिवस पुन्हा उत्तर भारतात आणणार असल्याचा निर्धार. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
 
हे वाचलात का ?: Cyclone Ditwah : श्रीलंकेत वादळ दिटवाहमुळे झालेल्या मुसळधार पावसात १२३ जणांचा मृत्यू, तर अनेक जण अजूनही बेपत्ता
 
संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आहेत. काँग्रेस च्या विरोधात देशात सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीतून एकच विरोधी पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या स्वरूपातून साकार करायचा होता.त्यासाठी त्यांनी तत्कालीन नेत्यांना पत्र लिहिले होते.त्याप्रमाणे नंतर च्या काळात इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस विरोधात देशात सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीतून जनता पार्टी उभी राहिली.जनता पार्टीचा प्रयोग हा सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून एकच विरोधी पक्ष स्थापन करण्याचा प्रयोग होता. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकलनेतील एकच प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आम्हाला स्थापन करता आला नाही याची आपल्याला खंत आहे असे ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0