मुंबई : (Hong Kong blaze) चीनमधील प्रसिद्ध शहर असलेल्या हाँगकाँगमधील (Hong Kong blaze) ताई पो येथील वांग फुक कोर्ट गृहनिर्माण संकुलात लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्याप्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार २६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेत आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला असून, २७९ लोक बेपत्ता आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांनी देखील या घटनेची दखल घेत, मृतांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आहे, त्यासोबतच या घटनेला जबाबदार तीन जणांना अटक करण्यात आली आहे. (Hong Kong blaze)
उत्तरेकडील ताई पो जिल्ह्यातील या गर्दीने भरलेल्या कॉम्प्लेक्समध्ये आठ ब्लॉक्समध्ये २००० अपार्टमेंट आहेत, ज्यामध्ये ४,६०० हून अधिक लोक राहतात. इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटनी घडली आहे. (Hong Kong blaze)