Indian Arts Festival : भारतीय कला महोत्सवासाठी ठाण्याच्या गीतेश शिंदे यांची निवड

    27-Nov-2025   
Total Views |
(Indian Arts Festival)
 
मुंबई : (Indian Arts Festival) साहित्य अकादमी, दिल्ली व साऊथ सेंट्रल झोनल कल्चरल सेंट्रल आयोजित 'भारतीय कला महोत्सवातामध्ये (Indian Arts Festival) ठाण्यातील कवी गीतेश शिंदे यांची निवड झाली आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी हैद्राबादच्या राष्ट्रपति निलायम येथे पार पडणाऱ्या या कलामहोत्सवातील 'फेस टू फेस' कार्यक्रमात आपले विचार मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. साहित्य अकादमी मान्यता प्राप्त २४ भाषांतील लेखक, कवींसोबत मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळते आहे.(Indian Arts Festival)
 
हेही वाचा :  Hema Malini : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची पहिली पोस्ट; म्हणाल्या, "धरम जी..."
 
गीतेश शिंदे यांचे 'निमित्तमात्र' व 'सीसीटीव्हींच्या गर्द छायेत' हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कविवर्य आरती प्रभु पुरस्कार, कृ. ब. निकुंब पुरस्कार, श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार, श्रीस्थानक पुरस्कार, अक्षरबंध, चौथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती पुरस्कार अशा अनेक सन्मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांचे 'यमन' व 'चित्रलिपी' या दोन कोंकणी कवितासंग्रहाचे मराठी अनुवादही साहित्य अकादमीकडून प्रकाशित झाले आहेत. या सन्मानाच्या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.(Indian Arts Festival)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.