मुंबई : (Gautam Gambhir) भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेने २-० अशा फरकाने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला ४०८ धावांनी पराभूत केलं. ५४९ धावांचं आव्हान असताना भारत केवळ १४० धावाच करू शकलं. धावांचा विचार करता हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने तब्बल २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा रेकॉर्ड काही चांगला राहिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आता गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सामना संपल्यानंतर आता गौतम गंभीरने राजीनाम्यावर भाष्य करत या या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाले, "०-२ अशा पराभवासाठी भारतीय संघातील प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरले पाहिजे, दोष सर्वांचा आहे, पण सुरुवात माझ्यापासून करा. भारतीय क्रिकेट महत्त्वाचे आहे, मी महत्त्वाचा नाही. माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल."
पुढे ते म्हणाले, "आपल्याला चांगले खेळण्याची गरज आहे. ९५/१ ते १२२/७ हे स्वीकारार्ह नाही. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही विशिष्ट शॉटला दोष देत नाही. दोष सर्वांचाच आहे. मी कधीही कोणत्या व्यक्तींना दोष दिला नाही आणि पुढेही देणार नाही," (Gautam Gambhir)
दरम्यान, आतापर्यंत गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली भारताने १८ पैकी १० कसोटी सामने गमावले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून मालिका गमवावी लागली. संघात नवीन चेहरे असूनही, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारताला गमवावा लागला. त्यासोबतच, २५ वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. (Gautam Gambhir)