Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, आज होणारा लग्नसोहळा स्थगित

23 Nov 2025 17:46:04
Smriti Mandhana
 
मुंबई : (Smriti Mandhana) भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिक्रेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा लग्नसोहळा तात्पुर्ता स्थगित करण्यात आला आहे. स्मृतीच्या (Smriti Mandhana) वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीच्या समडोळ येथील मानधाना फार्म हाऊसवर आज संध्याकाळी स्मृतीचा लग्न सोहळा पार पडणार होता, यासाठी लग्नाची तयारीही जोरदार सुरू होती, पण स्मृतीचे (Smriti Mandhana) वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 
हेही वाचा :  Narayan Surve : ठाण्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा 'जागर' संपन्न
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, स्मृतीच्या (Smriti Mandhana) वडिलांच्या प्रकृती ठीक असून ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांना सद्य स्थितीत रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच शक्य तितका आराम करण्यासही डॉक्टरांनी बजावल्याने लग्न सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्मृतीच्या कुटुंबियांनी सांगितले. (Smriti Mandhana)
 
स्मृती मनधाना (Smriti Mandhana) आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा संध्याकाळी सांगलीमध्ये साडेचार वाजता लग्न सोहळा पार पडणार होता. लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातील दिग्गज उपसथित राहणार होते. लग्न स्थळाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. तसंच लग्न स्थळाचं डेकोरेशन काढण्याचं काम सुरू आहे. (Smriti Mandhana)
 
 
Powered By Sangraha 9.0